अकोला:- श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्यामध्ये श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष ह भ प वासुदेव महाराज महल्ले पाटील पालखीत पाई वारी करीत आहे . लखपती व्यावसायिक असलेले एवढ्या व्यस्त जीवनामध्ये सुद्धा दरवर्षी पायी वारी नित्यनेमानाचे करतात अनेक लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही वेळ नाही .या महाराजा सारखा बिझी असलेला माणूस मी पाहिला नाही तरीही ते पंढरपूर वारी ,देहूची वारी दरवर्षी नित्यनेमाने करीत असताना मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.अनेक पालखीचे अध्यक्ष ए.सी गाडीत वारी करताना,फिरताना दिसतात परंतु अकोटच्या या श्रीसंत वासुदेव महाराज संस्थेचे अध्यक्ष मात्र एक वेगळे रसायन आहे. रोज सकाळी उठल्यानंतर श्री संत वासुदेव महाराज यांचे पूजन व दर्शन घेतात तसेच आपल्या कमाईतील खिशातले शंभर रुपये महाराजांच्या दानपेटी टाकतात तसेच दिवसभर महाराजांना पालखी सोहळ्या दरम्यान अनेक भक्तगण पैसे दान देतात परंतु हे स्वतःमी पाहिलेले आहे की हे महाराज त्यातला एक रूपयाही स्वतःच्या खिशात न टाकता वासुदेव महाराज यांच्या दानपेटीमध्ये ते सर्व पैसे टाकतात. कीर्तनाचे एक रुपयाचे मानधन ते कधी घेत नाहीत . व आपले श्रम पैसा वेळ संपूर्ण या कार्यासाठी वाहून घेतलेले आहे . पैदल वारीत त्यांना फिरण्याची एवढी सवय नसताना सुद्धा ते या पैदलवारी मध्ये संपूर्ण प्रवास वारकऱ्यांसोबत पायी चालून करतात अनेक पालखीचे अध्यक्ष डायरेक्ट पंढरपुरात दाखल होतात परंतु महाराजांनी आपले वेगळेपण या ठिकाणी जपून श्री ची सेवा करीत असतात. आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते माऊलीचे हे कार्य सातत्याने कित्येक वर्षापासून करीत आहेत पैशासाठी प्रतिष्ठेसाठी मरमर करणाऱ्या महाराजां समोर हा एक आगळावेगळा आदर्श आहे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांना ,वासुदेव महाराजांना अभिप्रेत असलेले कार्या ते करीत आहेत. पालखीत असलेल्या प्रत्येक वारकऱ्याची प्रत्येक माणसाची विचारपूस चौकशी करून त्याच्या सुखदुःखात सहभागी होतात.
.श्री संत वासुदेव महाराजांचे पूजन दर्शन घेताना संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले पाटील यांचे हे कार्य असेच फुलत राहो चालत राहो हेच श्री चरणी प्रार्थना. त्यांच्या या त्यागमय कार्याला नमन..