गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना च्या वतीने दि. ०५ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजीत कुणबी समाज संघटनेच्या मोर्चास जाहीर पाठींबा देणार असल्याचे माळी समाज संघटना यांनी दर्शविले आहे.
१. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये व मराठ्यांना ओबीसी आरक्षणामधून आरक्षण देऊ नये.
२. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्राची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. ३. वर्ग १ ते ४ ची सर्व पदे कंत्राटदार कंपन्यांकडून न भरता, यंत्रणेमार्फत, आरक्षण निकषानुसार भरावीत. शासकीय
४. जिल्हा परिषद व शासकीय शाळा कार्पोरेट क्षेत्राकडे सोपवू नये. ५. गडचिरोली मध्ये ओबीसींचे १९ टक्के आरक्षण पूर्ववत करावे.
या मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेने दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधीकारी कार्यालयासमोर या मागण्यांकरीता धरणे आंदोलन केले होते. दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२३ रोजी कुणबी समाज संघटना, गडचिरोली जिल्हा यांचे वतीनेसुध्दा जिल्हाधीकारी कार्यालय, गडचिरोली वर भव्य जनसमुदायासह मोर्चा काढण्याचे नियोजीत केलें आहे. या सर्व मागण्या व्यापक जनहिताच्या दृष्टीने करण्यात येत असल्याने अगदी रास्त आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचा यास जाहीर पाठींबा देण्याचे ठरविले आहे.