वाशिम : शासनातील अधिकारी भ्रष्ट असले तर त्यांना पायबंद घालण्या करीता,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. राजकारण किंवा उद्योगपती करीता ईडी,सिबिआय कार्यरत आहे.परंतु या कार्यवाहीने खरोखर अशा भ्रष्टाचारी लोकांची संख्या घटत आहे की वाढतच जात आहे.याचे चिंतन केले तर भ्रष्टाचार कमी होण्या ऐवजी गाजर गवता प्रमाणे जास्तीत जास्त फोफावत असतांनाच दिसतो.एखाद्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी लाच घेतांना रंगेहाथ पकडल्या गेला तर त्याच्यावर होणारी कार्यवाही आणि त्याची समाजात होणारी बदनामी बघून इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी अशा घटनांपासून बोध घेऊन सुधरायला पाहिजे व चारित्र्य सांभाळून,इमाने ईतबारे प्रामाणिक जीवन जगायला पाहीजे.मात्र दुदैवाने ही भ्रष्टाचारी बोध न घेता भ्रष्टाचार करीतच रहातात.त्यामुळे बऱ्याच वेळा एकाच विभागात,एकाच गावात आणि एकाच कार्यालयात वारंवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया होतांना दिसतात.असो हे झाले अधिकारी कर्मचारी स्तरावरील लोकांचे भ्रष्टाचार.असेच खालच्या स्तरावर तळागाळातील ग्रामिण भागात देखील भ्रष्टाचाराची ही काटेरी बांडगुळ प्रचंड वाढतांना आणि प्रामाणिक व सज्जन व्यक्तिंना सातत्याने डिवचतांना दिसत आहे.पैसा मिळविण्यासाठी या बांडगुळाचं वाट्टेल ते चाललेल आहे. वरवर हसतमुख चेहऱ्याची आणि अगदी गोड गोड बोलणारी काही मंडळी गोड बोलून एखाद्या कामाकरीता,कामापूर्वीच अव्वाच्या सव्वा पैसा घेऊन बसतात.आणि सज्जन व प्रामाणिक लोकांना त्यांच्या मागे फिरवत असतात.काम करण्याकरीता स्वतःची ऐपत व लायकी नसतांना दहा दहा व्यक्ती कडून पैसा अग्रिम घेतात. व त्याचाच पैसा घेऊन त्याला रडकुंडी आणतात.नंतर स्वतःच्या मनमर्जीने ठेक्यावर घेतलेली कामे करून देतात. किंवा समोरच्या व्यक्तिच्या घामाचा पैसा बुडवून स्वतःचे मनोरे बांधतात.आज बांधकाम क्षेत्र असो की एखादा लघु उद्योग असो.प्रत्येक क्षेत्रात हे गोडबोले सज्जन व प्रामाणिक व्यक्तिचा विश्वासघातच करीत आहेत.यांच्या अशा स्वार्थी वृत्तीमुळे मात्र पडणाऱ्या ठिणगीचा एक दिवस आगडोंब उसळणार आहे.आणि त्यामुळे अशा नालायक लोकांच्या पापाचा घडा भरल्यानंतर अशांची स्वार्थी प्रवृत्ती भस्मसात होणारच आहे. कारण म्हणतात ना "भगवान के घर देर है अंधेर नही ।"शेवटी हेच त्रिकालाबाधी सत्य आहे.मात्र लाज शरम नसणाऱ्या ह्या नालायकांना ज्यावेळी वस्तुस्थितीची जाण होईल. त्यादिवशी खूप वेळ झालेला असणार आहे.त्याचं शिलं पूर्णतः नष्ट झालेलं असणार आहे. अस्मानी असो वा सुलतानी पण आलेल्या संकटानी ह्या व्यक्ती कुटुंबासहीत स्वतःही पूर्णतः राख होणार आहेत.त्यामुळे आपला नातलग सगासोयरा असो की मित्रमंडळी,ओळखीचा असो की अनोळखी.कुणाचीही फसवणूक करू नका.कुणाच्याही कष्टाच्या पैशाचे मोल करा.कुणाच्याही पैशाचा मोबदला लवकर द्या.जीवन जगत असतांना एकमेकाची विशेषत: समोरचा व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो,स्त्री किंवा पुरुष असो, धनवान वा कंगालपती असो एकमेकांना एकमेका सोबत वेळोवेळी संबंध पडतात.त्यामुळे समाजात एकमेकावर विश्वास ठेवावा लागतो.म्हणून समोरच्याचा विश्वासघात न करता माणूसकीने वागा.प्रसंगी स्वतः उपवाशी राहून दुसऱ्याला भोजन दान देवून पुण्य मिळवा. असे प्रबोधनात्मक विचार विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहेत.