महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेल्या बारावीचा निकालात ब्रह्मपुरी येथील डाँ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयाने कला शाखेतील उत्तम निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयातून सत्र २०२१ -२२मध्ये बारावीच्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीनी कु.काजल गुलाब मेश्राम(75%), व दितीय क्रमांक कु. कोमल सोमेश्वर सुर्तीकार((74%),व तृतीय -करीना कवडू कांबळी(73.66%) टक्के गुण मिळवून प्राप्त केले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशराव बगमारे ,संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मनिषाताई बगमारे,सचिव भास्करजी उरकुडे, प्राचार्या शारदताई ठाकरे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. एच. के. बगमारे,प्रा. एस. के. खोब्रागडे, गोवर्धन दोनाडकर, व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.