कारंजा : कारंजा तालुका तथा संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह पश्चिाम विदर्भाला ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेताचे तात्काळ पंचनामे करुन तात्काळ पिकांची नुकसान भरपाई मिळणे बाबत पिपल्स रिपब्लिकन पार्टी कारंजा तालुक्याच्या वतीने वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना कारंजा तहसिलदारामार्फत बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सलग दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे व काही मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचा फटका पश्चिेम विदर्भातील अमरावती महसुल विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती,यवतमाळ, कारंजा तालुक्यासह वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच 5 जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतातील पिकांना बसला आहे.
सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिक रखडल्या गेली, शेतात पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले.परिणामी त्यामुळे पिंकांची वाढ खुंटली,पिक पिवळी पडल्या गेली, कारंजा तालुक्यात काही कास्तकारांच्या शेतीत पाहणी केली असता 20-25 एक्कर शेतामध्ये सोयाबिन पेरणी केल्यानंतर आज रोजी सोयाबिनच्या झाडांना एक सुध्दा शेंग आलेली नसल्यामुळे असे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अतोनात नुकसान झालेले आहे, तसेच अतिवृष्टीने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर पिकं खराब झालीत.
सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांडच्या शेतातील सोयाबिन, कपाशी, तूर, मुंग, उडिदसह संत्रा बागायतदारांचे फळगळती होऊन नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हा महसुल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करुन सरकारने तात्काळ मदत देण्याबाबत सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे. मात्र अद्यापपयर्र्ंत झालेल्या पिक नुकसानीच्या भरपाईसाठी अजून पर्यंत शासनस्तरावर महसुल विभागामार्फत मौक्यावर जावून शेताचे सर्व्हेक्षण करुन पंचनामे होतांना दिसत नसल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्यां ची चिंता वाढली आहे.
महोदय, आपल्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकर्यां च्या पाठीशी उभे राहून संकटकाळात त्यांना मदत करणारे असून अशा परिस्थितीत अद्यापपर्यंत शेतकर्यांाना आर्थिक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांंची परिस्थिती लक्षात घेवून कारंजा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात तथा पश्चियम विदर्भाला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरीव अशा प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येवून त्यांना मोठा दिलासा द्यावा.अशी मागणी आज दि.09 सप्टेंबर 2024 रोजी माजी खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली खाली पिपल्स रिपब्लिकन पार्टी,कारंजा (लाड) जि. वाशिमच्या वतीने लक्षवेधी निवेदन मोहीम अंतर्गत स्वाक्षरीसह या निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
निवेदन देते वेळेस वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत, समाजसेवक विजय गागरे, चाँद मुन्नीवाले, दिनेश आगासे, गोपाल सोनुलकर, प्रल्हाद शहाकार, विनायक वरघट, दादाराव डोंगरदिवे, विष्णू ढोके, माजी ग्रा.पं. सदस्य कामरगांव मोहसीनभाई, बाळु अवघाते, शे.अज्जु शे.कासम, अजीत सुरवाडे, अरुण जामनिक यांच्यासह बहुसंख्येने शेतकर्यां सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, बहुसंख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....