दिनांक 15 मार्च २०२४ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे सदस्य संपूर्ण भारतभर दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक कार्य करीत आहेत . या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांना विविध मानसन्मान देऊन समाजा द्वारे त्यांचा गौरव करण्यात येत आहे . *दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची दिव्यांग सदस्य अस्मिता मिश्रा यांना नुकताच महिला दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल Women of substance award 2024 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . Hypedge Magazine partner-Shi Inspire Magazine तर्फे गोवा येथे महिला दिनी रंगारंग कार्यक्रमात संपूर्ण भारतातून आलेल्या निवडक सामाजिक कार्यकर्त्यात अकोल्याच्या अस्मिता मिश्रा यांना दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे*. अस्मिता मिश्रा ह्या स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संपूर्ण भारतभर दिव्यांग बांधवांसाठी आपले योगदान देत आहेत .
पुरस्कार सोहळ्यात नाचे मयुरी फेम अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी अस्मिता मिश्रा यांच्या कार्याला आपल्या भाषणातून शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. सत्काराला उत्तर देताना अस्मिता मिश्रा यांनी आपल्या यशाचे श्रेय आई अरुणा सोळंके , सामाजिक क्षेत्रातील आपले गुरु डॉ.विशाल कोरडे , कुटुंबीय व प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणींना दिले . या पुरस्काराने सामाजिक कार्यात अजून मोठे योगदान देण्यास बळ मिळणार आहे असेही तिने व्यक्त केले. दि.15 मार्च २०२४ रोजी अकोल्यात आल्यावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सर्व सदस्यांनी अस्मिता मिश्रा यांचे अभिनंदन केले .