"लोकस्वातंत्र्य सामाजिक व सहकार रत्न गौरव" या राज्य पुरस्काराने गणेशराव देशमुख सन्मानित! आमदार नितीनबाप्पू देशमुख यांना "समाजरत्न गौरव" तर दमाणीच्या सभापति शुक्ल "समाजरत्न जीवन गौरव"
*अकोला* - बाळापूर तालूक्यातील निंबा येथे स्व.श्रीधरराव देशमुख व स्व.माणिकराव देशमुख तथा परिसरातील सर्व दिवंगत समाजसेवींच्या स्मरणार्थ मोतीबिंदू तपासणी व मोबत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये २०० जणांच्या तपासण्या करण्यात येऊन ५५ रूग्णांची या मोफत योजनेतील मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी निवड करण्यात आली.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने दमाणी नेत्र रूग्णालय,अकोला, व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॕंगिग गार्डन यांचे सौजन्न्याने तथा लोकक्रांती विकास मंच व परिसरातील नवयुवक व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी रितीने संपन्न झाले. लोकस्वातंत्र्यचे हे निंबा येथील तिसरे व सलग ७ वे शिबीर आहे.कोरोना काळात नोंदणीपत्रं देऊन रूग्ण पाठविण्यात आले होते.याकामी संघटना पदाधिकारी आणि सभासद आर्थिक सहकार्य करीत असतात.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोल्यातील निर्माण ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष गणेशराव देशमुख होते.तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी शिबीराचे उद्घाटन केले. कृषी,सामाजिक,सहकार आणि बॕंकीग क्षेत्रातील नेत्रदिपक वाटचालीचा गौरव म्हणून गणेशराव देशमुख यांना "लोकस्वातंत्र्य सामाजिक व सहकार रत्न गौरव" या राज्यस्तरीय पुरस्काराने याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. संबंधित क्षेत्रातील उल्लेखनिय प्रगतीबध्दल त्यांना देश- विदेशातूनही पुरस्कारांचे अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत.गरीब रूग्णांच्या दृष्टीदान आणि स्वस्थ्य रक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.अध्यक्ष संजय देशमुख यांनी पत्रकार कल्याणासोबतच संघटनेची सामाजिक आणि आरोग्यक्षेत्रातील वाटचाल प्रास्ताविकातून विषद केली.याप्रसंगी आमदार नितीनबाप्पू देशमुख यांना लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव" तर व दमाणीच्या सभापती शुक्ल यांनाही "समाजरत्न जीवन गौरव" पुरस्कार घोषित करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम महापुरूषांना वंदन अभिवादन व विविध बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

दमाणी नेत्र रूग्णालयाचे नेत्रतंत्रज्ञ डॉ.दत्ता पवार व डॉ.सौरव इंगोले यांनी रूग्ण तपासणी,व ड्रॉप तथा चष्मे सुनिल सरोदे व संतोष पुंड यांनी केले.याप्रसंगी लोकस्वातंत्र्य उपाध्यक्ष प्रदिपभाऊ खाडे,सचिव राजेन्द्रबाप्पू देशमुख,पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार, डॉ.शंकराव सांगळे,सौ.जया भारती,सौ.दिपाली बाहेकर,सरपंच सौ.ज्योतीताई सोनोने,सतिश देशमुख (विश्वप्रभात) प्रा.मंदार देशमुख,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर व सागर लोडम,मधुसुदन माळी,दिपक सिरसाट, लक्ष्मणराव कांबळे,हरीभाऊ समुद्रे,योगेश सिरसाट प्रकाश जंजाळ,देवराव परघरमोर,या लोकस्वातंत्र्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबीरासाठी डॉ.अमित देशमुख, डॉ.प्रशांत मांगुळकर, गणेश देशमुख,गोपालदास चितलांगे, ज्ञानेश्वर कोरडे,पांडूरंग वसू ,पंडितराव देशमुख,मंगेश मिटकरी,बाळू बदर्खे,दिपक मास्कर,वासुदेव बावणे, पुरूषोत्तम सोनोने,रामु हिवसे,विनायक आंबुसकर यांनी विशेष सहकार्य केले.संचलन सौ.जया भारती यांनी तर आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....