कारंजा (लाड) राज्यातील अतिवृष्टिने बाधीत,वाशीम जिल्ह्यासह संपूर्ण कारंजा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या शेतजमिनीसह पिकांचे आणि ग्रामस्थांच्या घरादारासह पशुधनाचे व शेतमजूरांच्या रोजंदारीचे, लवकर भरून न निघणारे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर, शासनाने तात्काळ दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून, सरसकट प्रत्येक शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांना ओल्या दुष्काळाच्या सोईसवलती सह नुकसान भरपाईची आर्थीक मदत विना विलंब देण्याच्या न्याय्य मागणीसाठी दि.०३ आँक्टोबर २०२५ रोजी, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया,शहर अध्यक्ष अब्दुल राजीक शेख तथा तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांचे नेतृत्वात, तहसिलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनामध्ये खालील प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्याचे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.
१) जिल्ह्यात ओला दृष्काळ जाहीर झाला पाहिजे.
२)सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी ५०,०००/रुपये मदत मिळाली पाहिजे.
३)शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी यांनी तहसिलदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या आणि शांततेच्या मार्गाने निवेदन दिले.
यावेळी कारंजा काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय देशमुख,आणि काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल राजीक शेख,माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया, सेवादलचे विजय पा.कडू,जि.प.सदस्य रामदास भोने, जिल्हा प्रवक्ता स्वप्निल तायडे, मैनुदिन सौदागर ,महमंद राजा ,रोमील लाठीया, अक्षय बनसोड, विशाल अघमे,दादाराव बहुटे, विशाल जोगी, प्रदीप वानखडे, जुम्माभाई पप्पुवाले,नविन इंगोले,आसिफखाँन, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, अ.शमी अ.अहमद, जुम्मा भाई तौसीफ खान असलम ठेकेदार अफरोज खान राजा भाई राहिल खान गुड्डु खान जुबेर भाई वसीमभाई शेख नहिम, देविदास राठोड, जी.एन चव्हाण,एम.पी.चव्हाण,ओमप्रकाश ढोणे आणि बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....