कारंजा : स्थानिक श्री किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 8 फेब्रुवारी 2024, राज्यशास्त्र विभाग आणि कारंजा तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 2024 च्या निवडणूका विचारात घेता विद्यार्थ्यांसाठी EVM आणि VVPAT जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाचे अध्यक्ष ॲङ मोतीसिंहजी मोहता, मानद सचीव ,पवनजी माहेश्वरी, कार्यकारणी सदस्य डॉ. अजय कांत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यशास्त्र विभाग आणि कारंजा तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात ईव्हीएम, बॅलेट युनीट, व्हीव्हीपॅट यंत्रासंबंधी सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी मनवर मं.अ. कारंजा, धानोरकर तलाठी, कारंजा, गुगळे तलाठी-धामणी, तेजस रोकडे कोतवाल, किन्ही, कृष्णा इंगळे काळी, कारंजा आदीत्य बलखंडे निवडणूक ऑपरेटर यांनी विद्यार्थ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्याक्षीक दाखवले तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.निलेश चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर कसा करावा, या यंत्राच्या सहाय्याने मतदान करण्याची प्रक्रिया, कोणाला मत दिलं, याची खात्री व्हीव्हीपॅट मशिनच्या साहाय्याने कशी केली जाईल यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि मतदान करण्याचे आवाहान केले. यावेळी डॉ.दिनेश रघुवंशी, डॉ.नीलम छंगाणी, डॉ.किरण वाघमारे, प्रा. जी. न. गजभिये, डॉ. निलेश शीर्के, मनोज राठोड तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.