प्रधानमंत्री खनीज शेत्र कल्याण योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत श्रद्धेय श्री.अटल बिहारी वाजपेयी ई- अभ्यासिका नूतन वास्तूचे लोकार्पण सोहळा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय , जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा शुभ हस्ते दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार रामदासआंबटकर, विधान परिषद सदस्य ,मा. आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदारसंघ ,नागपूर विभाग माननीय आमदार सुधाकर अडवाले, विधान परिषद सदस्य, शिक्षक मतदार संघ, नागपूर विभाग. हे राहणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रतिभा धानोरकर, विधानसभा सदस्य वरोरा- भद्रावती विधानसभा मतदारसंघ, प्रमुख उपस्थिती माननीय श्री विनय गौडा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर. माननीय गजानन भोयर, प्रशासक ,नगरपरिषद वरोरा हे राहणार आहे
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेच्या निधीतून ३६६.२७ लक्ष रू. निर्माण झालेल्या या अभ्यासिकेचा बांधकामाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला.
या अभ्यासिकेला माजी प्रधानमंत्री स्व. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेत सर्वानुमते नगरसेवकांसोबत मंजूर झाला. सदर इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास आले असून ही ई- अभ्यासिका आता दि.२५ ऑगस्ट पासून वाचकांकरीता उपलब्ध होणार आहे.
. सदर ई - अभ्यासिका लोकार्पण सोहळा प्रसंगी सर्व जनतेने उपस्थीत राहावे असे आव्हान मा.मुख्याधिकारी यांनी केले आहे.