वाशिम : वाशिम जिल्हयात दि.5 नोव्हेंबर रोजी काही ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत आहे. मतमोजणी दि.6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.दि.12 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.त्यामुळे जिल्हयात विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यांकरीता धरणे आंदोलने उपोषणे करण्यात येत आहेत.
वाशिम जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे, याकरीता दि.14 नोव्हेंबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह,अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नसल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आदेशात नमूद केले आहे.