कारंजा / मानोरा : कारंजा शहरात परत दुसरे दिवशी बुधवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता,अचानक वातावरणात बदल होऊन,गारांच्या मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. गारा पडत असल्याने पालावर राहणारे,झोपडी व कच्च्या घरात राहणाऱ्या तळागाळातील गोरगरीब नागरिकांना, निसर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विजांचा लखलखाट आणि ढगाचा प्रचंड गडगडाट व धो धो कोसळणाऱ्या पाऊसाच्या धारांमुळे, ग्रामिण भागातून, शहरात कामधंद्यांकरीता येणाऱ्या हजारो चाकरमान्यांची पंचाईत झाल्याचे दिसून येत असून संपूर्ण कारंजा मानोरा दारव्हा तालुक्यात कामरगाव, धनज, धामनी खडी, पोहा, गीर्डा, इंझोरी, दापुरा इत्यादी भागात सर्वदूर अवकाळी पाऊस सुरु असल्याचे व त्यातच विद्युत बत्ती गुल झालेली असल्याचे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांचे वृत्त आहे.असे प्रसिद्धीपत्रकात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले आहे.