कारंजा (लाड) कारंजा नगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंधाधुंद कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठयाचे वेळापत्रक कोलमडल्याने,दरमहा वेळेवर पाणीपुरवठयाची बिले भरणाऱ्या, लाडक्या बहिनी आणि नागरिकावर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करण्याची वेळ आली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून, कारंजा नगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या,पिंप्री (फारेस्ट) येथील अडाण धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून,आज रोजी अडाण धरण हे तुडूंब भरलेले आहे. परंतु असे असतांनाही, शहरात दर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत असतो. परंतु चालू आठवड्यात गेल्या सोमवारी आणि बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून, पिण्याचे पाणीच सोडण्यात आले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करण्याची वेळ कारंजावासी लाडक्या बहिनींसह नागरिकांवर आल्यामुळे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालया विषयी संताप व्यक्त होत असून,सदर कार्यालयाने जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या सेवेमध्ये सुधारणा करून पाणीपुरवठा करावा. अन्यथा जनआक्रोश उफाळून आल्याने,जीवन प्राधिकरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा आणावा लागेल.असा इशारा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.