कोरची:-
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व एकलव्य आदर्श निवासी विद्यालय कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालक मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे याकरिता देशभक्तीपर एकल नृत्य, समुह नृत्य, भाषण, ब्राइटर माईंड इत्यादी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते म्हणजे ब्राईटर मांईड अर्थात तिसरा डोळा. इयत्ता दुसरीमधील हिंमाशी नरोटे हिने डोळ्याला पट्टी बांधून कार्डवरील चित्र, नोटावरील नंबर, न्युज पेपरचे वाचन,पाहुण्यांनी परीधान केलेले ड्रेसचा रंग ओळखला यावेळी तिच्या हया कृतीने पालकवर्ग व प्रमुख पाहुण्यांना अचंबित केले. यासाठी प्रा. अरुण कायंदे,मनोज आचार्य यांनी त्यांना प्रशिक्षित केले. हा चमत्काराचा वा जादूचा प्रकार नसून मेडिटेशन व बौद्धिक एकाग्रतेचा अनुभव आहे असं यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर शाळेतील विद्यार्थी इंग्रजी भाषेतून भाषण देताना पाहून पालक आनंदीत होऊन पाल्याचे कौतुक केले. यानिमित्ताने शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती पालकांना देण्यात आली. तसेच वर्षभरात विविध स्पर्धेत सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आंला. सदर पालक मेळाव्याकरीता एकलव्य आणि आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे बहुसंख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरेश कामडी यांनी केले. तर सुत्रसंचालन डाकराम ठाकरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आशिषभाऊ अग्रवाल पुढारी न्युजचे वार्ताहर होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक राहुलभाऊ अ़ंबादे लोकमतचे पत्रकार हे होते. प्रमुख पाहुणे जितेंद्रभाऊ सहारे पत्रकार ,शैलैन्द्र ठाकरे साहेब पीआय पोलिस स्टेशन कोरची ,मनितराम मडावी, मुख्याध्यापक उमाकांत ढोक,एकलव्य विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्रसिंग ठाकूर, निरंजना मडावी,महेश नरोटे,प्रमिलाताई होळी, , प्रा.हरेश कामडी,प्रा.मनोज गजभिये ,भैयालाल कुरसुंगे,गुरुराज मेंढे, अमित मेश्राम, डाकराम ठाकरे,मनोज आचार्य,गीता राऊत,लिना वाटगुरे,सुषमा अंबोणे, एकलव्य स्कूलचे विजय गौतम,सुनील कुमार वर्मा ,जान्हवी शर्मा, राघवेंद्र विजय,रामप्रसाद व्हाडागीर, अंजली नेगी, विशाल वर्मा, विवेक सिंह, मयंक नैनसुख,संदिप कुमार,दक्षता, अधिक्षक विरेंद्र मडावी,निखिल दाणे अधिक्षिका सिमा कुरेकार,श्रध्दा श्रीवास्तव , मिलिंद पिलारे,सुधीर सातपुते तथा आश्रमशळा आणि एकलव्य विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....