कारंजा (लाड) : कारंजा नगरीच्या इतिहासाचा उलगडा करतांना, आवर्जून उल्लेख होतो तो म्हणजे कारंजा विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार स्व. बाबासाहेब धाबेकर यांचा. कारंजा मतदार संघाचा खऱ्या अर्थाने विकास झाला तो स्व. बाबासाहेब धाबेकर हे कारंजा नगरीचे आमदार असतांना "न भुतो न भविष्यती" असे त्यांचे नेतृत्व होते. दमदार आमदार, माजी मंत्री,योजनामहर्षी,सहकार नेते,विकास पुरुष स्व.बाबासाहेब धाबेकर असतांना, कारंजा तालुक्यातील ग्रामिण भाग, प्रत्येक लहानमोठ्या गावखेड्यापर्यंत डांबरी रस्त्याचे निर्माण करून त्या खेडेगावातील ग्रामिण जनतेला कारंजा शहरासी जोडण्याचे काम त्यांनी प्राधान्याने केले.भविष्यात केव्हाही कारंजा नगरीतील जनतेवर पाणीटंचाईच्या सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून दुरदृष्टी ठेवून, पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईप लाईन टाकून कारंजेकराची पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या कायमची दूर केली. ग्रामिण भागातील गोरगरीबाच्या होतकरू आणि दिव्यांग विद्यार्थ्याची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली.असी महत्वपूर्ण विकास कामे करीत असतांना कारंजा हीच आपली कर्मभूमी म्हणून केली येथील खेडया पाडयातील तळागाळातील गोरगरीब हिंदू मुस्लिम नागरिकांना जवळ करून त्यांना प्रेमाची,सन्मानाची व आपलेपणाची वागणूक दिली, अशा कारंजेकराचे आदरस्थानी आणि सदोदित स्मरणात राहणाऱ्या,विकासपुरुष स्व.बाबासाहेब धाबेकर यांची दि. 19 फेब्रुवारी रोजी जयती. त्यानिमित्ताने दरवर्षी बाबासाहेब यांच्या हजारो चाहत्याचा, मित्रमंडळीचा आणि आप्तेष्टाचा जनसागर त्यांना अभिवादन करण्याकरीता, स्व.बाबासाहेब धाबेकर सभागृह कारंजा येथे एकत्र येत असतो.स्व.बाबासाहेब धाबेकर मित्र मंडळातर्फे त्यांच्या जयंती निमित्त ,सोमवार दि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:00 वाजता कारंजा पाजरापोळ संस्था व गो ग्रिन फाऊंडेशन कारंजा तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून,दुपारी 02:00 वाजता स्व बाबासाहेब धाबेकर सभागृह, मुर्तिजापूर रोड कारंजा (लाड) येथे अभिवादन कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.