फिर्यादी नामे गोवर्धन नीलकंठ गायधने वय_ 41 वर्ष रा. मराठा लेआउट कूर्झा,ब्रह्मपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला अपक्रमांक 266/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी हे दिनांक 17 6 2025 रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना रात्रीच्या वेळेस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून,आत घरामध्ये जाऊन, बेडरूम मध्ये लॉकर मध्ये असलेले पैसे,सोन्याचे दागिने, असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथकामार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना,पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने, आरोपी नामे अनिल रामभाऊ दांडेकर वय-30 वर्ष रा.हत्तीगोटा, ब्रह्मपुरी 2)विकी ज्ञानेश्वर जांगडे वय 30 वर्ष रा. नानोरी ता. ब्रह्मपुरी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी, सदर घरफोडी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीना अटक करून आरोपीकडून 7500 रुपये रोख, चोरी केलेल्या रकमेमधून विकत घेतलेला 5500 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल,5000 रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 15000 रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची नाकातील नथ असा एकूण 33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायालय ब्रह्मपुरी यांनी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे
सदरची कामगिरी मा .पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पो हवा अजय कटाईत , पोना मुकेश गजबे,पोशी स्वप्निल पळसपगार, चंदू कुरसंगे, इरशाद खान,निलेश तुमसरे यांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश गजबे हे करीत आहे.