वाशिम : राज्याच्या हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात व विशेषतः पूर्व पाश्चिम विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. पश्चिम बंगालपासून महाराष्ट्र,पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, मराठवाड्यापर्यंत सद्यस्थितीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ताशी ३० ते ४० किमी वेगाने चक्राकार वारे वहात असून,अवकाळी वादळी पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही भागात भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर,अकोला,अमरावती वाशिम,यवतमाळ , बुलडाणा जिल्ह्यात काल बुधवार दि १४ मे रोजी दुपारनंतर सायंकाळी व रात्रभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून,अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या फळबागा,पालेभाज्या आदी पिकाचे नुकसान झाले आहे. विजांचा प्रचंड कडकडाट होत होता त्यामुळे मराठवाडा विभागात विजा पडल्याचेही वृत्त आहे.याचबरोबर गुरुवार दि १५ मे सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, वारे वादळ विजाच्या कडकडाटात काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याकरीता नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचेकडून करण्यात आले आहे.