भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राच्या सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा नुकतीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढोरवासा येथे नुकतीच संपन्न झाली.
केंद्राचे केंद्रप्रमुख मा भारतजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या काही महत्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आल्या यात उल्हास अँप बद्दल सखोल चर्चा करण्यात आली, सोबत नवभारत साक्षरता अभियान याबद्दल येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना यावच उपस्थित सर्व मुख्याध्यापक यांना सविस्तर सूचना करून चर्चा करण्यात आली.
निपुण भारत बद्दल चर्चा करून निपुण उत्सव साजरा करण्यावर चर्चा करण्यात आली सोबत मराठा कुणबी सर्वेक्षण, प्रहरी लहर याबद्दल माहिती देण्यात आली
याप्रसंगी काही अडचणींना योग्य प्रकारे वसंत जांभूळे सर यांनी उत्तरे येऊन समाधान केले.
यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढोरवासा चे प्रभारी मुख्याध्यापक दिनकरजी गेडाम सर सोबत केंद्रातील अकरा जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक व दोन माध्यमिक चे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोडापे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय गाडगे सर यांनी केले.