ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा माहेर तुंबडी मेंढा खरबी तोरगाव खुर्द, तोरगाव बुज, नांन्होरी, दिघोरी, सावलगाव, बेलगाव, देऊळगाव आदी. या गावातील शेतामधील धान पिकावर पेरवा रोगाची लागण झाली आहे. धान पीक क्षतीग्रस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात शासनाने मोक्का चौकशी करून ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना उचित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय अव्वर सचिव कृषी विभाग मंत्रालय, मुंबई, माननीय अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य, माननीय कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन प्रेषित केले आहे.
निवेदन देतेवेळी केवळरामजी पारधी तालुकाप्रमुख ब्रम्हपुरी, डॉ. रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख ब्रम्हपुरी, गणेश बागडे शाखाप्रमुख माहेर, गुलाब बागडे, उर्मिला अलोणे उपजिल्हा संघटिका महिला आघाडी, कुंदा कमाने तालुका संघटिका ब्रम्हपुरी, ललिता कांबळे शहर संघटिका, रमाकांत अरगेलवार एसटी कामगार सेना, देवा अमृतकर, नाना अमृतकर, राजेश्वर मेश्राम, दशरथ बागडे, विनोद मेश्राम आदी. शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.