अकोला:- सायबर पोलिसांची इंदोर मध्ये कारवाई अकोला खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टरला सुमारे 60 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या महिला आरोपीस सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशातील इंदोर येथून अटक केली. तन्वीर शहाबाद समीर कौशल 46 राहणार बीयाबाणी प्रेमा कुमारी हॉस्पिटल जवळ इंदोर असे महिला आरोपीचे नाव असून तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. मलकापूर मधील रामकृष्ण नगर येथील रहिवासी डॉक्टर राहुल विलास सुरूशे उपस्थित यांनी बारा मे 2025 रोजी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगत फिर्यादी कडून एकूण 60 लाख 38 हजार दोनशे रुपये घेतले मात्र नफा न मिळाल्याने व आणखी पैसे गुंतवण्याचा दबाव आणल्याने फसवणूक झाल्याचे डॉक्टर राहुल यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रकरणाची तक्रार केली खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला सायबर पोलिसांनी डिजिटल पुरावे तांत्रिक माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीचा माग काढला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार 18 सप्टेंबर रोजी पथक इंदोर येथे रवाना झाले स्थानिक पोलिसांच्या मदतीने 19 सप्टेंबर रोजी आरोपी महिला महिलेला ताब्यात घेण्यात आले आरोपीला 20 सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मने, महेंद्र सपकाळ, प्रशांत केदारे, अतुल अजने, तेजस देशमुख व महिला पोलीस अंमलदार सपना अटकलवाढ यांनी केली.