कारंजा (लाड) : मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे.या संत सेना महाराजांच्या उपदेशानुसार "श्री क्षेत्र अरणगाव ते तीर्थक्षेत्र उत्तर काशी अयोध्या" पायी दिंडी अरणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथून अयोध्या नगरीला पालखी सोहळा जात असताना पदयात्रा मार्गात दत्तनगरी कारंजाला मुक्कामी
आली असता सदर्हु पालखीचा दुपारचा मुक्काम कारंजा (लाड) येथील ( नागपूर संभाजी नगर हायवे अनई सब स्टेशन ) कारंजा येथे होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष सत्यजित उर्फ बंन्टीभाऊ गाडगे यांना ही माहिती कळवताच त्यांनी क्षनाचाही विलंब न करता समाजसेवा करण्यासाठी स्वतः जातीने उपस्थिती दर्शवून त्यांनी वारकरी मंडळीची स्वागत व्यवस्था केली. तसेच नाभिक समाजसेवक देखील उपस्थित झाले. यावेळी कारंजा नाभिक समाजाच्या वतीने सर्व वारकऱ्यांची दाढी कटिंग मोफत करण्यात आली. त्यामध्ये शिवा अरूणराव घर्डीनकर ,धीरज गजाननराव घोडसाड वेदांत सुधीरराव घोडसाड ओम अशोकराव साखरकर गोकुल विलासराव साखरकर या समाज बांधवांनी सेवा केली अशी बातमी प्रसिद्धी प्रमुख सुधीर घोडसाड यांनी कळवीली आहे .