कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये कारंजा तालुका विधी सेवा प्राधिकरण वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 30/04/2 3 रोजी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 275 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. दिवाणी फौजदारी न्यायालय कारंजाचे मुख्य न्यायाधीश एम.एच.हक व सह न्यायाधीश एस एन पुंड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये विविध प्रकरणातील एकून 1540992 /- रु रक्कम - रुपयांची वसुली करण्यात आली ज्यामध्ये मोटर वाहन केसेस 03 तडजोड रक्कम - 900 रु . धनादेश अनादर 05 प्रकरण रक्कम - 493266 रु गुन्हा कबूल प्रकरणे 259 रक्कम -1018007/- रुपये तसेच दिवाणी -6 रु 872026 दाखल विदर्भ कोकण बँक वसुली 73000/-/निकाली काढण्यात आली असे एकूण 1540992/- रु वसुली करण्यात आली.
यावेळी कारंजा न्यायलय विधीज्ञ मंडळ अध्यक्ष न्यायलयातील सहायक अधीक्षक बेलखेडे, थेरं, कर्मचारी श्रीनगरे , अब्दुल रेहमान श्रीमती गाठोडे , श्रीनगरे आदि न्यायलयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले