कारंजा (लाड) : येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र रामगाव (रामेश्वर) ता. दारव्हा जि.यवतमाळ येथे रामापूर योगी मठ येथे प.पू.सिद्ध गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या संदर्भात अधिक वृत्त असे की,विदर्भातील,पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,विध्यांचल पर्वतरांगेतील औषधी वनातील त्रिवेणी संगमावर,उत्तरवाहिनी अडाण माता (अडाण नदी) वाहते.स्कंद पुराणातील संदर्भानुसार ह्या जागेला प्रयागराज किंवा त्र्यंबकेश्वर एवढेच महत्व असल्यामुळे येथे त्रीदेवाचा,नवनाथाचा,रामदूत हनुमंत रायाचा वास आहे. शिवाय सिद्ध गुरु रामनाथ महाराजांनी या ठिकाणाची निवड आपल्या तपश्चर्ये करीता करून, ह्या जागेची तपोभूमी म्हणून निवड करून आपला आश्रम या ठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने आणि तपोभूमी मुळे हा संपूर्ण परिसर पावन क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असून, हे पवित्र ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग किंवा नंदनवन म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे येथे केलेल्या,सर्व प्रकारच्या तप,जप,यज्ञ,पूजा,विधी या ठिकाणी केल्याने पुण्य मिळत असल्याची आख्यायिका आहे. आजही येथे वेगवेगळी जंगली श्वापदं, वेगवेगळे पक्षी आणि शेकडो जडीबुटी वनस्पती औषधी झाडे,बेलवृक्ष आहेत. अशा या ठिकाणी आज रोजी मठाधिश म्हणून सिद्ध गुरु अभेद्य महाराज गुरु सेवानाथ महाराज हे सेवारत आहेत.अशा ह्या रामापूर योगी मठात गुरुपरंपरेप्रमाणे झालेल्या,प.पू. सिद्ध गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांची बारावी पुण्यतिथी सोमवार,दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होत असून त्यानिमित्त सिद्ध गुरु अभेद्यनाथ गुरु सेवानाथ महाराज यांच्या शुभ हस्ते प. पू
.सिद्ध गुरु सेवानाथ महाराज यांच्या समाधीचे,पादुकांचे शंखढाल पूजन करण्यात येईल. व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाचे परम भक्त तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचेकडे मठाचे शिष्यपरिवारातील नागनाथ महाराज गुरु अभेद्यनाथ महाराज आणि मार्तंडनाथ गुरु अभेद्यनाथ महाराज रामापूर योगी मठ, रामगाव (रामेश्वर) यांनी दिली असून सर्व भाविकांना महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.