ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:-श्री गुरुवैर्य नाना जोशी यांनी आयुर्वेद व पंचकर्म हजारो विद्यार्थ्यांना शिकवून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मृतीत ब्रम्हपुरीत आयुर्वेद रथयात्रा व निःशुल्क आरोग्य शिबीर घेण्यात आले. देलनवडी वॉर्ड ते डॉ. नरेश देशमुख यांच्या आयुर्वेद क्लिनिक पर्यंत अनेक ठिकाणी रथाचे व मान्यवरांचे स्वागत झाले. वैद्य दत्तात्रय दगडगावे लातूर व वैद्य नितीन मेशकर वर्धा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ही रथयात्रा आयोजित केली. रथ यात्रेचे व शिबिराचे उद्घाटन मा नगराध्यक्ष सौ.रीताताई उराडे यांनी केले. शिबिरात 200 रुग्णांची तपासणी, पंचकर्म चिकित्सा व निःशुल्क ओषधी वाटप करण्यात आले. रिताताई व मान्यवरांनी आयुर्वेद जीवन शैली, आध्यात्मिक विकास व आयुर्वेद चिकित्सा या बद्दल मार्गदर्शन केले.
निसर्गमित्र डॉ मोहन वाडेकर यांनी वनस्पती दर्शन व आयुर्वेद तसेच वैद्य दत्तात्रय दगडगावे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रथ्यात्रेचे अनुभव सांगितले.
रथ यात्रेचे आयोजन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ब्रम्हपुरी व श्री गजानन आयुर्वेद क्लिनिक (डॉ नरेश देशमुख) यांनी केले. स्टेम पोद्दार स्कूल, मेडलाइफ पाथोलॉजी,prd व युवारंग, युवा परीवर्तन नर्सिंग, नीलमोहर नर्सरी, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रम्हकुमारी, झेड कार्ट, पतंजली योग समिती ब्रम्हपुरी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ श्वेता राखडे, प्रास्ताविक डॉ नरेश देशमुख, आभार डॉ हिरालाल मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाला नगरसेवक सतीश हुमने, मनोज वठे, ॲड. वसंतराव भुसारी, डॉ. खिजेंद्र गेडाम, श्री शंकरराव बोकडे, श्री रितेश पिलारे, श्री रितेश उराडे, डॉ रमेश नारींगे, डॉ रामेश्वर राखडे, डॉ सुनील नाकाडे, डॉ सुप्रिया नाकाडे, भगवानजी कंनाके, रामकुमार झाडे, डॉ सोनम लीचडे, राहुल जुवारे , गोवर्धन दोनाडकर सचिव पत्रकार संघ ब्रम्हपुरी, डॉ गिराडकर मॅडम, डॉ मोनिका तलमले ,डॉ रोहित चीलबुले , डॉ पल्लवी चीलबुले डॉ प्रणय कोसे आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....