राज्याचे विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून न.प. गटनेता विलास विखार यांच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश
केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला व युवतींची असुरक्षितता या सर्व कारणांमुळे देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे महीला़ंसह युवकांचा कल आता काॅंग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे. सोबतच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुरु असलेल्या विकासकामांच्या झपाट्यामुळे येथील सर्वसामान्य माणूस सुखावला असुन विविध पक्षात कार्यरत असलेल्या ब्रम्हपुरी शहरातील गांधीनगर, बोंडेगाव येथील महीला व युवक कार्यकर्त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेता, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरपरिषदेचे गटनेता तथा बांधकाम सभापती विलास विखार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये शेकडो महीला व युवकांचा समावेश आहे.
ब्रम्हपूरी शहरात आयोजित एका कार्यक्रमात या सर्व महीला व युवकांनी काॅंग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी उपस्थित काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले आहे.
यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगराध्यक्षा सौ.रीताताई उराडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, न.प.नियोजन सभापती महेश भर्रे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, न.प. महीला व बालकल्याण सभापती सुनिता तिडके, नगरसेविका लताताई ठाकुर, नगरसेविका सरिता पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, शहर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष सोमेश्वर उपासे, प्रा. चंद्रशेखर गणवीर, सुधाताई राऊत, लीनाताई जोगे, मंगलाताई टिकले, रश्मीताई पगाडे यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये अमन बोदेले, निहाल शेंद्रे, प्रविण शेंडे, शिलधन मेश्राम, अनिकेत शिंगाडे, बन्नी शेंद्रे, क्रिश मारबते, सागर सारवे, गोलू दुनेदार, मयुर वालदे, सानुज लोखंडे, अशित माटे, शुभम मेश्राम, सचिन आंबोरकर, अजय मरस्कोल्हे, उत्कर्ष करंडे, लक्की सय्यद, भुषण चामकवार, वेदांत धोंगडे, विनीत झुरमुरे, डेनी शेंडे सोनू पठाण, सुशिला सोंडवले, गीता कुडले, रसिका भानारकर, अजिरा खोब्रागडे, वर्षा कोले, सुनिता भजनकर, रीना मेश्राम, मोबिता मेश्राम, गायत्री नागापुरे, फिरोजा पठाण, शीला बोरघरे, नंदा घरडे, विश्वदिप रामटेके, शिवम सेठीये, अनिकेत झुरमुरे, आदित्य मेश्राम, हिमांशू मेश्राम, अश्रृत हुमणे, आर्यन भोयर, धम्मदीप रामटेके यांसह अन्य युवक व महीलांचा समावेश आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....