अकोला:-
आत्मनिर्भर तसेच विकसित भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला साकार रूप देण्यासाठी मातृशक्ती कटिबद्ध असून देशाच्या संरक्षणाच्या साठी सेनादलामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळात खुलेद्वार झाले तसेच वैज्ञानिक सोबत विमान चालक व प्रत्येक क्षेत्रामध्ये मातृ शक्ती भरारी करून राष्ट्र निर्माण मध्ये योगदान दिले आहे व मातृ शक्ती यांनी 51 टक्के पेक्षा जास्त मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला दिल्यामुळे तसेच कर्तुत्वान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी संजय धोत्रे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण भाजपा पूर्व उत्तर मंडळ महिला मोर्चा तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौभाग्यवती चंदाताई शर्मा हे होत्या* . मराठा मंगल कार्यालय रामदास पेठ येथे रोजी भाजपा पूर्व महिला मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी. ममता सारडा यांनी चालता बोलता प्रश्नावली स्पर्धा घेऊन महिलांना बक्षिसे देऊन त्यांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून पोलीस निरीक्षक देवकर मॅडम ह्या होत्या त्यांनी महिलांना आजच्या क मोबाईल मुळे होत असलेल्या गुन्ह्यांबद्दल माहिती दिली. मोबाईलचे फायदे व नुकसान याबद्दल त्यांनी सविस्तर वेळ पालकांनी योग्य ती पावले उचलावी व कशा पद्धतीने कार्य करावे या पद्धतीवर त्यांनी योग्य मार्गदर्शन केले.
. तसेच या कार्यक्रमात स्वसंरक्षण प्रशिक्षण नाटिका डॉक्टर खुशबू चोपडे आणि त्यांच्या टिम घेतले . सध्याच्या काळामध्ये महिलांनी संरक्षणा ची गरजेवर त्यांनी प्रात्यक्षिक करून धावपळीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणीवर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. भाजपा अकोला पूर्व महिला आघाडीचे अध्यक्ष निकिताताई देशमुख यांच्या कल्पनेचा व चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या वापरू शकतील एकत्रित करून कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी साधू वाद दिला
.महिलाढोल ताशक पथकाने आपले सादरीकरण करून सर्वांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपती वंदना प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सो मंजुषा सावरकर, अर्चनाताई शर्मा अर्चनाताई मसने सुनिता भाभी अग्रवाल सीमाताई मांगटे पाटील , चंदाताई शर्मा, समीक्षा ताई धोत्रे सुमन ताई गावंडे, गीतांजलीताई शेगोकार , सारिका ताई जैस्वाल आरती ताई घोगलीया अनिताताई चौधरी पल्लवीताई मोरे, रश्मी अवचार अनुराधाताई नावकर ऋचा शहा या उपस्थित होत्या.
रामदास पेठ परिसरातील मातृ सेवा संघातील संपूर्ण कार्यकारणीचा येथे सत्कार घेण्यात आला. मातृ सेवा संघ गेल्या 67 वर्षापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. या संघाचे आशाताई तारे याचा अध्यक्षतेखाली ही संस्था अजूनही सुरू आहे. या संस्थेमध्ये देवयानी ताई चौधरी , पद्माताई मानडगवणे, अंजलीताई कवीश्वर धुमे मॅडम आणखी सदस्य ही संस्था चालवत आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये प्रसिद्धी च्या मागे न राहता समाजातील घटकांची शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मातृ शक्तीची ओळख नवीन पिढ्याला व्हावी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची यावेळी सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर यांनी सांगितले. या सर्वाचा सौ सुहासिनी ताई धोत्रे यांनी सत्कार केला
. तसेच मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी तापडिया नगर परिसरातील सुरभी दोडके सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारी छोटीशी सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिचा पण सत्कार घेण्यात आला. योग क्षेत्रात प्रशिक्षित असलेल्या मायाताई भुईभार, मंनीषा ताई कुलकर्णी,यांचा पण सत्कार करण्यात आला अर्चनाताई शर्मा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मातृ शक्ती एकत्रित करून पूर्व महिला आघाडीने कार्यक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
. प्रेरणा क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे अन्नपूर्णा योजना चालवली जाते . मराठा नगर परिसरातील एकूण 40 ते 45 टिफिन ची व्यवस्था करणाऱ्या सौ उज्वला भांबेरे यांचे पण सत्कार घेण्यात आला. अशा सर्व क्षेत्रातील अनेक महिलांचा सत्कार भाजपा पूर्व उत्तर महिला मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौनिकीता राहुल देशमुख भाजपा पूर्व महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. यावेळी अकोला पूर्व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी 1000 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....