ट्रकने कारला धडक दिली यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागभीड- ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावरील मेंढा गावाजवळ घडली. जखमींची नावे किसन महादेव ठाकरे (६२) आणि साकार किसन ठाकरे (२७) दोघेही रा. नान्होरी तालुका ब्रह्मपुरी अशी आहेत. हे दोघेही एमएच ४९ बीबी १४६६ या क्रमांकाच्या कारने ब्रह्मपुरीकडून नागभीडकडे येत होते. तर एमएच ४० बीएल ३६७०हा ट्रक नागभीडकडून ब्रह्मपुरीकडे जात होता. हे दोन्ही वाहन किरमिटी फाट्याजवळ आले आणि एकमेकांना धडकले.