कारंजा : श्री 1008 आदिनाथ स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र हिरपूरच्या कमीटीची विषेश सभा दि. १८/०८/२०२४ रोजी घेण्यात आली होती. त्या सभेमध्ये गणपूर्ती पेक्षा जास्त सभासदांच्या उपस्थितीत, सर्वनुमते पूर्वीच्या कमेटीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या काही पदामध्ये बदल करून नवनिर्वाचीत पदाधिकारी व काही नविन सभासदांची निवड करण्यात आली होती. तसा ठराव सुद्धा प्रोसिडींग बुक मध्ये घेण्यात आलेला आहे. नवनिर्वाचीत संस्थेचे पदाधिकारी तथा सभासदांचे अभिनंदन संस्थेचे सचिव प्रा.श्री.नितिन घाटे यांनी केले. तसेच संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष ध.श्री. सुदर्शनजी टोपरे सर यांनी नविन तरुण लोकांना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळावी या उद्देशाने स्वतः अध्यक्ष पदाचा राजीनामा देवून संस्थेचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचे ठरविले. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे उपरोक्त अतिशय क्षेत्राची अनेक कार्ये चांगल्या प्रकारे पार पडलीत. त्याबद्दल त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच सभासदांतर्फे आभार व्यक्त करतात. यापुढेसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्राच्या विकासाची वाटचाल चालू राहील असे त्यांनी सांगितले. त्यावेळी संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष म्हणून ध.श्री. सुदर्शनजी राळेकर , कारंजा (लाड) यांची निवड करण्यात आली. त्यांचे सुद्धा संस्थेचे सचिव अभिनंदन करतात. यांच्या अध्यक्ष पदाच्या काळमध्ये संस्थेचे अपूर्ण कार्ये अधिक जलद गतीने पार पडतील व संस्थेच्या विकासाची गंगा अधिक वेगाने पुढे सरकत जाईल असे त्यांनी म्हटले तसेच संस्थेचे नवनिर्वाचीत पदाधिकारी कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष , समन्वयक तथा सर्व सन्माननीय सभासद , महिला सभासद यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन करतात. सर्व सन्माननीय सभासद बंधूना आवाहन करण्यात येते की, आपण सर्वां मिळून तन-मन-धनाने क्षेत्राचा विकास घडवून आणून एक अतुलनीय धार्मिक क्षेत्र निर्माण करू या . कारण श्री.१००८ आदिनाथ स्वामीचे दि.जैन अतिशय क्षेत्र हिरपूर हे क्षेत्र अंदाजे ४५० वर्ष पूरातन आहे. येथील आदिनाथ स्वामीची मन मोहक ,सुंदर अतिशयकारी ( चमत्कारी ) प्रतिमा आहे. असंख्य जैन बांधवांचे श्रद्धास्थान आहे. परंतू आज हे क्षेत्र पुढील विकासाची वाट बघत आहे. त्याकरीता आपल्या सर्वांची अथःक सहकार्याची आवश्यकता आहे ती नक्कीच आपणाकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा. सर्वांना पुनः जय जिनेंद्र||