तळोधी(बा.) : तालुका स्थरिय विज्ञानप्रदर्शनी मधे माध्यमिक आदिवासी गटातुन लोकविद्यालय सावरगाव येथिल वर्ग 9 वी विद्यार्थी आदित्य दिवाकर आंबोरकर यांनी प्रथम क्रंमाक पटकावला असुन यांचे जिल्हास्थरावर निवड करण्यात आली आहे. ट्विंकल इंग्लिस स्कुल नागभिड येथे आयोजीत विज्ञान प्रदर्शनीमधे "प्रदूषण विरहित इंधनसहित बहुउद्देशीय चुल्हा" हे मँडेल तयार करून ठेवण्यात आले होतो. या मँडेल ला तालुक्यातुन प्रथम क्रंमाक देण्यात आला.त्याच्या या यशामधे शिक्षिका एस.एल.ढोक यांचे मोलाचे सहकार्या लाभले असुन यशाबद्ल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याद्यापक, सर्व शिक्षक, व पालकानी अभिनदंन केले आहे.