अकोला :-
अकोल्याच्या विकासामध्ये तसेच जिल्ह्याच्या सहकार सामाजिक, आर्थिक शैक्षणिक आरोग्य सेवेमध्ये स्वर्गीय नानासाहेब सपकाळ यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या साध्या राहणीपासून सामाजिक दायित्व या त्यांच्या गुणाचा अंगीकार करून समाजाला दिशा देण्याची गरज असून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचा आदर्श त्यांच्या कार्याचा नवीन पिढीला माहिती व्हावी अनेक कठीण परिस्थितीमध्ये समाज आणि राष्ट्रासाठी आणि अकोल्यासाठी शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले महत्त्वपूर्ण योगदान इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाणार असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्वर्गीय नानासाहेब सपकाळ यांच्या जन्मशताब्दी निमित्त निळकंठ सूतगिरणी परिसरात अभिवादन करताना ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांना नमन करू न त्यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी सुद्धा ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी नानासाहेब सपकाळ यांनी केलेले कार्य तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाबूजी देशमुख वाचनालय निर्माण मध्ये महत्वपूर्ण योगदान देऊन आज या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक आयपीएस अधिकारी तसेच शिक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणात समाजातील बहुजन समाजातील विद्यार्थी घेत आहे. अभ्यास अभ्यासिका चा सुरुवात या लायब्ररीमधून करण्यात आली तसेच सहकार क्षेत्रामध्ये एक आदर्श निर्माण करू नानासाहेब सपकाळ नवीन पिढी निर्माण करण्याचं काम केलं अशा विचारवंताच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्याचा सौभाग्य मिळाला अशा शब्दात खासदार अनुप धोत्रे यांनी त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने अभिवादन केले.
डॉक्टर रणजीत सपकाळ, श्री शिरीष धोत्रे, किशोर पाटील, जयंत मसने, माधव मानकर विजय अग्रवाल विवेक भरणे, गिरीश जोशी दिलीप पटोकार, गणेश तायडे, बाल टाले, कृष्णा शर्मा, प्राध्यापक राजेश बेले, रणजीत खेडकर, गोपाल मुळे, गणेश अंधारे ,गणेश सारसे, प्रदीप नंदापुरे, श्रीराम देशमुख डॉक्टर युवराज देशमुख डॉक्टर विनोद बोर्डे, डॉक्टर अमित कावरे, गणेश तायडे,, एडवोकेट नितीन गवळी, दत्ता भरणे, अजय पांडे, रवी खेडकर प्रवीण हगवणे प्रवीण भौरदकर, संजय पाटील, राहुल मुरारका, वैभव माहोरे, रमेश दुतोंडे पंकज पळसपगार, संदीप गावंडे मिलिंद राऊत विठ्ठल देशमुख आधी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते,
आपल्या प्रतिक्रिया द्या....