अकोला:-
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या १० वर्षांपासून अकोला जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे.या १० वर्षात ग्रुपच्या माध्यमातून जवळपास १०३ वाचनालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच जवळपास १ लाख च्यावर पुस्तके गरीब-गरजू-होतकरू विद्यार्थ्याना वितरित करण्यात आलेली आहेत.तसेच विविध व्याख्याने,कार्यशाळा, शिबिराच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि तरूण-तरूणी-विद्यार्थी यांच्यासाठी ग्रुपचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रभर पोहचले आहे.
दरवर्षीप्रमाणे विश्वगुरु स्वामी विवेकानंद जयंती व स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन च्या वतीने स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार देण्यात येतो.अकोला जिल्ह्यात शैक्षणिक/सामाजिक/कृषी/साहित्य/पत्रकारिता इ.क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५ मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.आजपर्यंत Posts जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.यावर्षी या पुरस्कारासाठी खालील मान्यवरांची निवड स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफऑर्गनायझेशन च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमने केली आहे.
स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार :- २०२४ चे मानकरी
१.मा.श्री.संजय देशमुख(राष्ट्रीय अध्यक्ष :- लोकस्वातंत्र्य पत्रकार संघ तसेच संपादक विश्वप्रभात)
२.मा.श्री.हिम्मत ढाळे(राष्ट्रीय अध्यक्ष :- अंकुर साहित्य संघ तसेच प्रसिद्ध साहित्यिक)
३.मा.श्री.विशाल राखोंडे (युवाश्री
जिल्हा राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त)
४.मा.प्रा.राजेश रामरतन दिवनाले
(राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हाध्यक्ष :-महाराष्ट्र इंग्लिश स्कुल टीचर्स असोसिएशन, अकोला)
५.मा.श्री. गजानन तुकाराम काळे
(विभागीय कार्याध्यक्ष :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग)
दि.१३ जानेवारी २०२४( वार:-शनिवार) ला या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रा.राजेश पाटिल ताले
"अध्यक्ष :- स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन" यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
लोकस्वातंत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख साहेब यांचे अभिनंदन मराठी लाईव्ह न्युजचे संपादक तथा लोकस्वातंत्र पत्रकार संघाचे विभागिय संघटन तथा संपर्क प्रमुख डिजिटल मिडीया खान्देश विभाग प्रमुख यांनी केले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....