बार्शिटाकळी : येथून जवळच असलेल्या, डोणज (आसरा माता) लगत असलेल्या ग्राम शेलू (खुर्द) येथे शेतकऱ्यांकडून दरवर्षी पोळा सण उत्साहात साजरा केला जात असतो.त्याच परंपरने,सोमवार दि. 02 सप्टेंबर 2024 रोजी शेलु (खुर्द) येथील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून पोळ्याचा सण आनंद व उत्साहाने साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावेळी बैलांना स्नान घालून,रंगरंगोटी करून,झुलं चढवून त्यांच्या गळ्यात घुंगराच्या माळा, कवळ्यांच्या माळा तसेच फुलांच्या माळांनी त्यांना सजविण्यात आले. मारोतीरायाच्या आणि महादेव मंदिरात त्यांना दर्शनाला नेऊन पोळा भरविण्यात आला. पोळा फुटल्यानंतर बैलांना घरोघरी नेण्यात येऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यांना पुरणपोळी आणी गोडाधोडाच्या पक्वान्नानी भरविण्यात आलं.यावेळी पोळ्यामध्ये कैलास पाटील महल्ले सरपंच ; बबनराव महल्ले, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू पाटील महल्ले,संतोषराव सोनोने, रवि पाटील महल्ले,कैलास पाटील महल्ले गजाननराव सोनोने,अंकुश सोनोने इत्यादी मंडळी उपस्थित होती .