भंडारा जिल्हा पोलिसांनी जुगार व दारू अड्ड्यांवर धाड घालून एकूण ६ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भंडारा, करडी, जवाहरनगर, साकोली पोलिस ठाणे हद्दीत करण्यात आली. भंडारा पोलिसांनी गांधी वॉर्ड येथील नीलकंठ गोपालराव हर्षे हा जुगार खेळत असल्याचे दिसून आला. त्याच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. करडी पोलिस ठाणे हद्दीत संजय विजय लिलारे यांच्या ताब्यातून रोख एक हजार रुपये व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.