ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा वांद्रा ला "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर" शाळा टप्पा-२ या स्पर्धेमध्ये तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळाला.
तालुक्यापासून ૨૮ किलो मीटर अंतरावर जंगल व्याप्त भागामध्ये ही शाळा असून तालुक्यातुन प्रथम क्रमांक आल्यामुळे गावातील जनतेमध्ये व पालक - विध्यार्थी यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या उपक्रमात सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेवून शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त केले.
शाळेत अंधश्रद्धा निर्मूलनपर कार्यक्रमाचे आयोजनामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, माझा गाव प्लॅस्टिक मुक्त अभियान, टाकावू प्लॅस्टिक, बाटलापासून शाळेत हँगिंग गार्डनची निर्मिती
परसबागेतील भाजीपाला व्यवस्थापन, कंपोस्ट खत नियोजन, पावसाच्या पाण्याचा पूर्णवापर, गावातील मोक्याच्या ठीकाणी तसेच शाळेत वृक्षसंवर्धनात्मक वृक्षांची लागवड, गावात पथनाटकाद्वारे नव साक्षरता अभियान, मतदान जनजागृती, लोकशाही पद्धतीने निवडणूक, स्काउट-गाईड पथकाद्वारे खरी कमाई उपक्रम, NJQF अंतर्गत बागकाम हा पुरक अभ्यासक्रम इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
शाळेच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले. प्रथम क्रमांक आल्यामुळे गावात पालक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....