ब्रह्मपुरी... सन २००२ ते २००३मध्ये किन्ही गावा जवळील राष्ट्रीय महामार्ग रणमोचन गावाकडे जाणाऱ्या मार्ग जवळील वडाच्या झाडाजवळ एका वानराचा अपघातात मृत्यू झाला होता. शिवाय त्या ठिकाणी अपघात ग्रस्त वानरांसाठी संतप्त वानर सेनेने चक्काजाम आंदोलन केले होते. मात्र रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहतूक धारकांवर वानर टोळी चौथाळून नागरिकावर हल्ला करत होते.त्यानंतर काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र काही किन्ही गावातील नागरिकांच्या वतीने मृत वानरावर मनुष्याप्रमाणे रीतीरीवाल्यानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. व त्यानंतर त्याची रणमोचन गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर किन्ही गावा- लगतच समाधी बनवण्यात आली. आजही माकड देव माकडाची प्रतिकृती राष्ट्रीय मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. शिवाय रनमोचन कडे जाणाऱ्या मार्गाचा होकायंत्र ठरत असली तरी मात्र गेले वीस वर्षापासून ही मूर्ती जीर्णोद्वाराच्या प्रतीक्षेत आहे. त्यावर धुळ ऊन वारा पाऊस नेहमी पडत असतो. त्यामुळे ही मूर्ती आता. कुचकाम मी ठरत असल्याचा ठपका गावकरी ठेवीत असून यासाठी आता निधीची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी वेळीच या मागडीकडे लक्ष देऊन वरून छत व मूर्तीची सजावट करावी अशी मागणी किन्ही गावातील वानर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष मारुती तूपट यांच्यासह रनमोचन येथील नागरिकांनी केली आहे