कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने दील्ली वेसीच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता व निविदेस सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. दि.२३ मे २०२३ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई शासन निर्णयान्वये दिल्ली वेस, कारंजालाड, ता. कारंजा, जि. वाशिम या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाकरीता खालील न्युनतम निविदेस व रु. ४,५४,६०,१५८/- (अक्षरी चार कोटी चोपन्न लक्ष साठ हजार एकशे अठ्ठावण्ण फक्त) (वस्तू व सेवाकर आणि कामगार विमासहीत) इतक्या रकमेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच या कामाकरिता रु.४,५४,६०,१५८/- (अक्षरी चार कोटी चोपन्न लक्ष साठ हजार एकशे अठ्ठावण्ण फक्त) (वस्तू व सेवाकर आणि कामगार विमासहीत) इतक्या रकमेच्या मे. एन. जे.. काकडे, नागपूर यांच्या न्यूनतम निविदेस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. अंदाज पत्रकिय किंमत ३,५९,१९,५८७ /- आहे.दिल्ली वेस, कारंजालाड, ता. कारंजा, जि. वाशिम या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या रु. ३,५९.१९.५८७/- इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास संदर्भाधीन क्र. १(पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. स्मारके २०२१/प्र. क १९२/सां. का.३) च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करुन न्यूनतम निविदेचा प्रस्ताव व त्यानुसार सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव संचालकांनी संदर्भाधीन क्र. २ ( संचालक, पुरातत्व, वस्तुसंग्रहालये, संचालनालय, मुंबई पत्र क्र . स्मारके/२०२३ / ९७१ )च्या पत्राव्दारे शासन मान्यतेस सादर केला आहे. सदर न्यूनतम निविदेच्या प्रस्तावास व सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार मा.राजेंद्र पाटणी यांनी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांच्या कडे उपरोक्त विषयी पत्र दिनांक 22 जुन 2022 रोजी पत्र दिले होते व त्याच वेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी पुरातत्व विभागाच्या संचालकास कार्यवाहीचे आदेश दिले होते.आमदार पाटणी यांनी त्यांच्या पत्रात , दिल्ली वेस हे कारंजा शहराच्या पश्चिम दिशेस आहे. सदर वेस कमानयुक्त चौकोनी आकाराची आहे. वेसीच्या दोन्ही बाजुस द्वारपालकक्ष व बुरुज आहेत. काळाच्या ओघात वेस अतिशय जिर्ण व क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. सदर वेसीची जतन दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. वेसीची वर्तमानस्थिती लक्षात घेता संपूर्ण वेस उतरवुन त्याची पुर्नउभारणी करणे आवश्यक असल्यामुळे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, नागपुर यांनी सदर स्मारकाच्या जतन दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव सादर केला आहे.तरी कारंजा येथील वेसीच्या स्मारकाच्या जतन दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून अधोरेखित केले होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.