कारंजा : कारंजा (लाड) येथील संत गजानन महाराजांच्या सेवाधारी मंडळींकडून प्रत्येक एकादशीला कारंजा तालुक्यातील तळागाळातील गोरगरीब वयोवृद्ध माऊली भक्तांना श्रीक्षेत्र शेगाव येथे जाऊन माऊलीच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून बिपीन वाणी व भाविकांच्या संकल्पनेतून मोफत बससेवा दिली जाते. त्यानुसार शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ रोजी पुत्रदा एकादशी निमत्ताने,सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी व सौ भारती निलेश सोमानी यांच्या पुढाकाराने मातोश्री स्वर्गीय सौ.स्नेहलता पूनमचंद सोमानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कारंजाच्या वृद्धाश्रमातील माऊली भक्तांची मोफत श्रीक्षेत्र शेगाव दर्शन वारी नेण्यात आली.कारंजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विपिन वाणी यांच्या संकल्पनेतून गत अनेक वर्षापासून महिन्याच्या दर एकादशीला मोफत शेगाव दर्शन वारी प्रायोजकांच्या सहकार्यातून काढण्यात येत आहे.स्थानिक कारंजा येथील शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणातील श्री संत गजानन मंदिर कारंजा येथून सदर वारीला श्री. नृसिह सरस्वती स्वामी संस्थानचे संचालक नीरज घुडे, प्रायोजक निलेश सोमानी सामाजिक कार्यकर्ते बिल्डर रुपेश बाहेती,संयोजक बिपिन वाणी, सेवाधारी सुरेशजी ठाकरे गुरुजी यांनी दर्शन वारीला भगवी झेंडी दाखवली. यावेळी सर्व वारी मधील सहभागी वृद्धाश्रमातील महिला पुरुष भाविकांना टोपी,दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान करण्यात येवून त्यांची अल्पोपहार फराळाची व्यवस्था करण्यात येवून त्यांना श्रीक्षेत्र शेगाव येथे रवाना करण्यात आले.सदर वारीमध्ये जवळ जवळ ३२ माऊली भक्त सहभागी झाली असून श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये पादुका दर्शन,श्री सिद्धटेक महालक्ष्मी माता मंदिर,बारा ज्योतिर्लिंग मंदिर इ. दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. दर्शन वारीला निरोप देण्याकरीता आयोजीत श्री संत गजानन महाराज मंदिर कारंजा येथील कार्यक्रमाला समाजसेवक श्याम सवाई, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,समीर देशपांडे, पंकज सोनोने,गजाननराव कडू, मिन्टुभाऊ सागाणी,गजानन सोळंके, साहेबराव पापळे इ.उपस्थित होते.यावेळी प्रायोजक निलेश सोमानी,रुपेश बाहेती नीरज घुडे,श्याम सवाई, पंकज सोनोने यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यापूर्वीही सौ.भारती निलेश सोमानी यांच्या वतीने स्वर्गीय सौ.श्वेता शाम सोमानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत श्रीक्षेत्र शेगाव दर्शन वारी माऊली भक्तांना घडविण्यात आली होती.मातोश्री स्वर्गीय सौ. स्नेहलता सोमानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सोमानी परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यामध्ये गरजवंतांना ब्लॅंकेट वाटप ,वृद्धाश्रमातील महिलां,पुरुषांना मोफत श्रीक्षेत्र शेगाव दर्शन वारी,कडाक्याच्या थंडीत बालकांना उबदार कपडे, सुंदरकांड पठण कार्यक्रम, वारकरी भजन कार्यक्रमा सोबतच आईच्या स्मृती पित्यर्थ श्रद्धा सुमन पुस्तकाचे विमोचन व विविध सामाजिक धार्मिक संघटनेला आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात येत आहे.सोमानी परिवारांने समाजसेवेचा आदर्श पायंडा रचला आहे. त्याबद्दल श्री संत गजानन महाराज सेवाधारी मंडळ कारंजा कडून सोमानी परिवाराचे अभिनंदन करण्यात येत आहे.