चंद्रपूर : घरात चोरटे घुसले आणि पतीला ठार केले. घरातील दागिने पळविले, अशी तक्रार देणारी पत्नीच पतीचा मारेकरी निघाली. प्रेमसंबंधात अडसर होत असल्याने प्रियकरांच्या मदतीने तिने पतीला ठार केले. मनोज रासेकर असे मृतकाचे नाव आहे. तो स्थानिक बालाजी वॉर्डातील रहिवासी आहे. खूनाची घटना गुरुवारला रात्री एक वाजताच्या सुमाराला घडली.
मनोजचा खून झाला. पत्नी आणि मृतकाच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत घेवून चोरटे पसार झाले, अशी तक्रार पोलिसात देण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात भादंवी 392. 460 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या हत्याकांडाने पोलिस यंत्रणा हादरली. सायबर सेलच्या माध्यमातून मृतक मनोजची पत्ती सुनीता हिचा मोबाईल तपासला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सुनीता हिच्या मुलीच्या शाळेतील शिक्षक स्वप्नील गावंडे (वय 34)याच्याशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेमसंबंधात मनोज हा अडसर ठरत होता. तिचा काटा काढण्यासाठी मनोजच्या हत्येचा कट या दोघांनी रचला. गत पंधरा दिवसांपासून पती आजारी आहे, हे बघून सुनीताने आणि स्वप्नीलने कट आखला. आजारपणातच मनोजचा मृत्यू झाला, असा देखावा निर्माण करण्याचा दोघांना उद्देश होता. घटनेच्या दिवशी रात्री सुनीताने प्रियकरला घरी बोलावून घेतले. गाढ झोपते असलेल्या मनोजच्या तोंडावर उशी दाबून त्याला ठार मारले. या झटापटी मनोजची आई जागी झाली. तिला सुद्धा या दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
सुनीताने घरात चोर घुसल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आलमारीतील सामान अस्ताव्यस्त केले. मृतकाच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि मनोजला दिली. त्यानंतर शांतपणे मारेकरी घराबाहेर पडला, असे तपासात निष्पन्न झाले. स्वप्नील आणि सुनिताला पोलिसांना ताब्यात घेतला