वाशिम : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करणे महत्वाचे आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे. आराखड्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या संकल्पनांचा समावेश करण्यात येणार आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता नियोजन समिती सभागृह येथे जिल्हा विकास आराखडा सन 2023-24 पासून तयार करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी यांचेसह विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांनी केले आहे.