कारंजा (लाड): मायेचा सागर असलेल्या स्व.सौ.छायाताई गजानन गावंडे यांच्या अचानक मृत्युमुळे समाजमन दुःखी झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,त्यांच्या दुःखद निधनाबद्दल,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजाचे वतीने,त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सौ.छायाताई गजानन गावंडे ह्या विदर्भ लोककलावंत संघटनेच्या आधारस्तंभ होत्या.संघटनेच्या त्या प्रमुख महिला कार्यकर्त्या होत्या.संघटनेची जबाबदारी त्यांनी वेळोवेळी यशस्वीपणे पार पाडली.संघटनेसाठी त्या तन-मन-धनाने मदत करायच्या.त्यांच्या नेतृत्वातच संघटनेने कलावंताकरीता अनेक राज्यस्तरीय लोककलावंत मेळावे आणि आंदोलने यशस्वी केली होती.आलेल्या पाहुण्यांची भोजन व्यवस्था त्या उत्कृष्टपणे सांभाळीत होत्या.त्यांना धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याची विशेष आवड होती. समाजातील रंजल्या-गांजल्या-गरीबांविषयी त्यांना स्नेह,आत्मियता व कळवळा होता.अनेकदा निराधार वयोवृद्धांना त्यांनी मायेचा आधार देवून,वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.दुर्धर आजार ग्रस्तांची सेवासुश्रूषा करून त्यांना स्वतः स्वयंपाक करून त्यांनी जेवू घातले.त्या भुकेल्या व्यक्तींची भूक,रुग्नाचे उपचार कसे करावे ? हे जाणत होत्या.कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी स्वतः स्वयंपाक करून गरजूंना जेवणाचे डबे दिले.त्या हाडाच्या समाजसेविका,उत्कृष्ट वक्त्या,गायीका,भजनी कलावंत होत्या.पर्यावरण वाचविण्यासाठी त्यांनी वृक्षारोपणाला महत्व देवून,वृक्षारोपन व संवर्धन केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मदत सामाजिक संस्था नागपूरचे संस्थापक दिनेशबाबू वाघमारे यांनी नागपूरच्या "राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात" त्यांना,राज्यस्तरीय "क्रांतिज्योती सावित्रीबाई नारीरत्न पुरस्कार" देवून आणि त्यांच्या रुग्नसेवेबद्दल,पत्रकार संदिप पिंपळकर यांच्या परिक्षणावरून अल्टरनेटिव्ह मेडिकल डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी,त्यांच्या रुग्नसेवेबद्दल "राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार" देवून सोलापूर येथे गौरवीले होते. त्यांनी स्वतः परिश्रम घेऊन प्रत्येक कामाची आवड जोपासली होती.पैशाची बचत कशी करावी ? बचतीमधून लघु व्यवसाय कसा करावा ? हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.काटकसर करीत त्यांनी शून्यातून विश्व साकारले होते. शिक्षणाला महत्व देऊन आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षीत करून मुलींचे विवाह करून दिले.संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात राहून त्यांनी नुकतेच स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहिले होते.घराच्या स्वप्नपूर्तीकडे त्यांची वाटचाल सुरू होती.अशातच दुदैवाने दि. १३ जून २०२५ रोजी त्यांचे मोठे भाऊ स्व.सुनिल नारायणराव काळे यांचे दुर्धर आजाराने निधन झाले.हा आघात हळव्या मनाच्या सौ. छायाताई गावंडे यांच्या मनात खोलवर रुजला.डोळ्यादेखत घडलेले हे आतिव दुःख त्यांना सहन झाले नाही.दुःखाने त्यांचे हृदय हेलावून गेले.व वडिलबंधूच्या मृत्युनंतर अवघ्या पंधरा विस मिनिटाचे अंतरानेच हृदयविकाराने त्यांची देखील प्राणज्योत मालवली.त्यांच्या मृत्युमुळे त्यांच्या मुलामुलींचा मायेचा पाझर गेला.सदोदित त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात प्रेमाने साथ देणारे गजाननराव गावंडे एकटे पडले.विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाची केव्हाही भरून न निघणारी भयंकर अशी हानी झाली.आज त्यांच्या मृत्युमुळे जो तो हळहळ व्यक्त करून त्यांच्या आदर्श अशा सेवाभावी कार्यापुढे नतमस्तक होत आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच खासदार संजयभाऊ देशमुख,शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक,आमदार सईताई डहाके,शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षा सौ.वैशाली येळणे, प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सौ. आशा राऊत आदींनी आपल्या शोकसंवेदना प्रगट केल्या आहेत.विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे यांनी मला सुखदु:खात साथ देणारी माझी हक्काची बहिण मला कायमची सोडून गेल्याचे म्हटले. प्रदिप वानखडे,उमेश अनासाने, लोमेश पाटील चौधरी,नंदकिशोर कव्हळकर,पांडूरंग माने,मोहित जोहरापूरकर,संजय कडोळे,रोहित महाजन,कैलास हांडे,मंगेश पाटील पिसे,ओंकार काकडे,अजाबराव ढळे,विजय पाटील खंडार,शेषराव पाटील इंगोले,माणिकराव पाटील हांडे,बाळकृष्णा काळे,सौ. सरलाबाई इंगोले,श्रीमती कांताबाई लोखंडे,सौ.इंदिराबाई मात्रे,श्रीमती देवकाबाई इंगोले, पर्यावरण प्रेमी सौ.कृपाताई ठाकरे,सौ. सिमाताई सातपुते, पत्रकार सौ.शारदाताई भुयार आदींनी त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याप्रती नतमस्तक होत,त्यांना आदरांजली अर्पण केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....