नागपूर : पत्रकारांची राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संस्थेद्वारे पत्रकारिता, सामाजिक कार्य, कोरोना काळातील विधायक कार्य, मुक्या प्राणाची सेवा कार्य, धार्मिक कार्य, व विविध उपक्रमाची दखल घेत वाशिम येथील , समाजकार्य व पत्रकारितेत अग्रणी असलेले तरुण तडफदार व प्रत्येक संकटात हजरजवाबी होत तळागाळातील सर्वसामान्यांना मदतीचा हाथ देणारे,
तरुण क्रांती मंचाचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक मातृभूमिचे निवासी संपादक निलेश सोमाणी यांना, केंद्रीय मंत्री विलासरावजी मुत्तमवार, आमदार राजूभाऊ पारवे, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जेष्ठ संपादक श्रीकृष्णजी चांडक, जेष्ठ संपादक श्रीपादजी अपराजित,संपादक भास्करजी लोंढे, संपादक सुदर्शन चक्रधर, विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रो. महेश पानसे, संघटक आनंद शर्मा यांच्या उपस्थितीत व हस्ते, पत्रकारीतेतील प्रतिष्ठेचा सर्वोच्च " महाराष्ट्रभूषण" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष मुंडे यांनी, "पत्रकार संघाचा पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रतिपादन केले ", कार्यक्रम नंतर कारंजा पत्रकार परिषदेचे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कारंजाचे जेष्ठ पत्रकार व समाजसेवी संजयजी कडोळे, नागपूर येथील संपादक आनंद शर्मा यांनी सुद्धा व्यासपिठावर निलेश सोमाणी यांचा सत्कार करीत त्यांचे अभिनंदन केले . नागपूर येथे दि .24 एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या " द्वितीय विदर्भस्तरीय आधिवेशनात वसंतराव नाईक कृषी सभागृह नागपूर येथे हा कार्यक्रम पार पडला .