राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच शाळेत वर्ग पहिलीत प्रवेश करणाऱ्या बालकांची अभ्यासासाठी पूर्ण तयारी व्हावी तसेच लहान बालकांचा बौद्धिक विकास शैक्षणिक विकास भाषा विकास सामाजिक भावनात्मक विकास व विद्यार्थ्यांची गण पूर्वतयारी व्हावी या उदात्त हेतूने ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ४ येथे शाळापूर्व तयारी मेळावा आज दिनांक 19 एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यामध्ये शाळेत इयत्ता पहिली मध्ये भरती होणाऱ्या मुलांच्या पालकांसह छोट्या मुलांची अभ्यासाच्या बाबतीतील विकासात्मक चाचणी घेण्यात आली त्यात उंची वजन छोटे मोठे छायाचित्र खेळणे व इतरही बाजू समजून घेण्यात आल्या सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा किती भौतिक ज्ञान आहे त्यावर आई-वडिलांनी जोर देण्याची गरज राहील. त्यामुळे समोरच्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणाचे ज्ञान कळेल हे या मेळाव्याचे महत्त्व होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा _व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू मुळे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकृष्ण चौधरी सर. तसेच श्री. टिकेश्वर शिवणकर सर. सौ. स्मिता वल्लालवार मॅडम . सौ. शालिनी चौधरी मॅडम यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला नगर सेविक निलिमा ताई सावरकर उपाध्यक्ष शा. व्य. स. निलकमल हुमणे. पत्रकार श्री महेश पिलारे यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मायाबाई वैद्य अंगणवाडी कार्यकर्त्या नफिसा शेख , सौ. गायत्री महेश पिलारे,कु. पूर्वा बन्सपाल, कु. प्रेरणा इठावले ब्रम्हपुरी यांनी मोलाचे सहकार्य केले.