स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे झाल्यानंतर आजही कारंजा मतदार संघात,मजूर आणि बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे मेहनतीचे जड कामे करणाऱ्या किंवा ऊसतोड मजूरांना पुण्या,मुंबई,नगर,सुरत, गुजरात कडे रोजगाराकरीता पलायन करावे लागते.तर आय. टी.आय.डिप्लोमा धारक किंवा विविध क्षेत्रातील अभियंते (इंजिनिअर) इ.सुशिक्षित तरुणांना पुण्या-मुंबई कडे स्वतःच्या आईवडील, कुटूंब,घरदार सोडून औद्योगीक कंपनीत जावे लागते.त्यामुळे मजूर आणि बेरोजगारांमध्ये सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनक्षोभ निर्माण होत आहे.तसेच शासन स्थानिक विद्यार्थ्याच्या सोयी सुविधेकरीता उच्च शिक्षणाची सुद्धा सोय करीत नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना सुद्धा इतरत्र उच्च शिक्षण घ्यावे लागते. "हाताला नाही काम आणि मुलांच्या शिक्षणाला नाही दाम." अशा परिस्थितीत मतदार संघातील नागरीक सापडले असल्याचे कडवे सत्य आहे. त्यामुळे शासनाने मतदार संघातील नागरीकांचा आतातरी विचार करून कारंजा येथे औद्योगीत वसाहतीचे निर्माण करून मागासदृष्ट्या आकांक्षीत असलेल्या मतदार संघात उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे दृष्टीने नियोजन करावे आणि येथील माध्यमिक विद्यालयातून प्राविण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याकरीता उच्च शिक्षणाची दालने उपलब्ध करून द्यावीत अशी स्थानिक नागरिकांची मागणी असून,आताही शासन दखल घेणारच नसेल तर येथील स्थानिक नागरीक आगामी निवडणूकावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचे वृत्त मिळाले आहे.