आरमोरी - येथील श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ७ जानेवारी २०२४ ला कोसा विकास कार्यालय वडसा रोड येथील संताजी ग्राऊंड वर सकाळी ११ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत तेली समाज मेळावा, वधु वर परीचय मेळावा, समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्र २०२२-२३ मधील वर्ग १० वी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त व वर्ग १२ वी मध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तेली समाज मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष योगिता भांडेकर, नगर परिषद गडचिरोली च्या माजी अध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे अध्यक्ष बबनराव फंड राहणार आहेत. तरी श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाचे पदाधिकारी तसेच तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तेली समाज आरमोरी चे अध्यक्ष बुधाजी किरमे व सचिव देविदास नैताम यांनी केले आहे