कारंजा : भारतिय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारोह आणि स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून,शासनाच्या "हर घर तिरंगा-घर घर तिरंगा" या निर्देषानुसार राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमल बजावणी करीता,गेल्या जवळ जवळ चाळीस वर्षापासून आपल्या गोंधळ-जागरण या पुरातन-ऐतिहासिक-पारंपारिक -सांस्कृतिक-राष्ट्रीय प्रबोधनपर लोककलेद्वारे आणि आपल्या लेखणीने साहित्यातून आणि वृत्तपत्रा मधून वेळोवेळी राष्ट्रीय समाजप्रबोधन करणारे,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त करणारे,आपल्या दारिद्रयावस्थेमुळे सुदामा म्हणून ओळखले जाणारे दिव्यांग जनसेवक संजय मधुकरराव कडोळे यांनी,मंगळवार दि. 15 ऑगष्ट रोजी सकाळी 07:30 वाजता,आपल्या झोपडी समोर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून, ध्वजारोहण केले.या घरगुती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेर्डा काळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदिप वानखडे उपस्थित होते.तसेच मातोश्री दुर्गाबाई मधुकरराव कडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कु. समृद्धी कडोळे, कु. संस्कृती कडोळे , कुमार -अथर्व कडोळे, संस्कार कडोळे यांनी राष्ट्रगीत, राज्यगीताचे सामुहिक गायन केले.त्यानंतर भारतमातेचा जयघोष करून वंदे मातरम ...! जय जय महाराष्ट्र माझा आदी गीते चिमुकल्यांनी सादर केली. त्यांचे करीता प्रमुख पाहुणे प्रदिप वानखडे यांनी चॉकलेट व मिठाईचे वाटप केले. स्वतः दारिद्री,निर्धन,बेघर,दिव्यांग व दुर्धर आजारग्रस्त असतांनाही दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे "सदैव आपण समाजाचे देणे लागतो याप्रमाणे सातारा लुटून स्वतःकरीता काहीही न ठेवता-आपल्या सभोवतालच्या रंजल्या गांजल्या समाजाची तन-मन-धनाने निष्काम सेवा करीत असतात.गरजु वयोवृद्ध गोरगरीबांना,दिव्यांगांना,दुर्धर आजारग्रस्त व्यक्तिंना शासनाकडून आणि समाजातील सेवाभावी संस्थाकडून मदत मिळवून देत असतात.त्यामुळे गोरगरीबांच्या हृदयामध्ये स्थान मिळविण्यात ते यशस्वी झाल्याचे त्यांचे मित्रमंडळी मोठ्या स्वाभिमानाने सांगतात. सायंकाळी 06:00 वाजता, ध्वजवंदन व ध्वजाला मानाचा मुजरा करीत झेंडा सन्मानपूर्वक उतरविण्यात आला.असे वृत्त पत्रकार कैलाश हांडे यांनी कळविले आहे.