वाशिम : स्वार्थी राजकारण न करता निव्वळ मानवसेवेकरीता अविरत समाजकार्य करणाऱ्या, कारंजा येथील दिव्यांग समाजसेवक, साहित्यीक,लोककलावंत तथा हाडाचे पत्रकार असलेले संजय मधुकरराव कडोळे यांची आणि त्यांच्या कलावंताच्या न्याय्य हक्कासाठी अविरतपणे लढणाऱ्या, विदर्भ लोककलावंत संघटनेची, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे अध्यक्ष एड कृष्णाजी जगदाळे यांनी स्वतः जातीने दखल घेऊन त्यांना 2022 चा आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार नाशिक येथील शाही समारंभात आज दि.30 ऑक्टोंबर 2022 रोजी, पद्मश्री डॉ विजय कुमार शहा यांचे हस्ते प्रदान केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय कडोळे यांनी स्वतःला राजकिय पक्षासोबत गुंतवून न घेता, नि:ष्पक्ष समाजकार्यावर भर दिलेला असून, स्वतः तळागाळातील मागासलेल्या, गोंधळी या भटक्या जमातीचे समाजातील आणि स्वतः बेघर व निराधार असल्यामुळे तसेच आर्थिक परिस्थितीने अक्षरशः लाचार असल्याने त्यांना तळागाळातील अनाथ, निराधार, दिव्यांगांची चांगलीच जाण आहे .
व म्हणून ते तळागाळातील, ग्रामिण लोकांकरीता अक्षरशः तन मन धनाने समाजसेवा करीत असतात. त्यांना राजकारणाची, प्रस्थापितांकडून होणार्या अन्यायाची, भ्रष्टाचार व जातियवाद करणाऱ्या आणि महत्वाचे म्हणजे अहंकारी वृत्तीच्या लोकांची तिव्र चिड असून संविधाने दिलेले अधिकार, सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मतेचे ते पुरस्कर्ते आहेत. व त्यानुसार मित्रमंडळीच्या सहकार्यातून त्यांचे अविरतपणे निःस्वार्थ कार्य सुरु असते. त्यांच्या यशस्वी कार्याच्या यशाचे श्रेय ते आपल्या निःस्वार्थी मित्रमंडळीना देतात.
व "माझ्या जीवलग व निष्ठावंत मित्रमंडळीच्या सहकार्याने व त्यांच्या माझ्यावरील विश्वासानेच मला माझ्या जीवनात यशस्वी होता येत असल्याचे स्वाभिमानाने सांगत असतात." आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे संजय कडोळे यांचे सर्व हितचिंतक मित्रमंडळींकडून अभिनंदन होत असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष उमेश अनासाने यांनी प्रसार माध्यमाकडे दिले आहे .