वाशिम - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाशीम येथे मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले . दरम्यान दिघेवाडी चौक येथे हाती कँडल घेत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .या निषेध आंदोलनात वाशीम येथील मौलाना यांच्या प्रमुख उपस्थित अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि मुस्लिम बाँधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळ पहलगाम येथे सोमवारी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या केलेल्या क्रूर हल्ल्याचा वाशीम येथील मुस्लिम समाजाच्या वतीने दिघेवाडी चौक येथे दि.२५ एप्रिल रोजी तीव्र निषेध नोंदविण्यात आला.तसेच हाती कँडल लावून हल्ल्यातील सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद, , आतंकवाद मुर्दाबाद,हिंदू मुस्लिम भाई-भाई, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या.तसेच या पहलगाम घटनेप्रकरणी सरकारने कठोर कारवाई करून अशा दहशतवाद्यांवर कठोर करावाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी वाशीम येथील मौलाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सालार ए उम्मत तंजीम,संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी,भारत मुक्ति मोर्चा,माळी मंच,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन वाशीम यांच्यासह अनेक संघटना आणि राजकीय पक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.