ब्रम्हपुरी:-
वाढदिवस म्हणला, की आपल्या देशातील बहुतांश युवक – युवती मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात. बाहेर फिरायला जाणे, मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी देणे, डीजे लावून नाचणे, अनावश्यक खर्च करणे, अशा असंख्य रुपात वाढदिवसाचे चित्र आजकाल पाहायला मिळते. देव दगडात नाही, तर देव माणसात आहे, असे संत गाडगे महाराज सांगायचे. जिवंतपणीच आपण आपल्या समाजाचे काही देणं लागतो, ही भावना मनाशी बांधून, ब्रम्हपुरी शहरातील युवा समाजसेवक म्हणून संपूर्ण विदर्भात ओळख असलेले उदयकुमार पगाडे या तरूणाने स्वतःच्या ३१ व्या वाढदिवसाच्या दिवशी, अवयव दानाचा संकल्प केला.
त्यासाठी, ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन, मरणोत्तर अवयव दानासाठी स्वतःच्या नावाची नोंदणी करून घेतली, व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 2015 वर्षा पासून विविध समाजहिताचे उपक्रम राबवित, उदयकुमार पगाडे यांनी आजवर स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला आहे, हेच विशेष.
महत्वाच म्हणजे, आपल्या भारत देशात दरवर्षी लाखो अवयव दात्यांची कमतरता भासत असते, आणि त्यामुळे जवळपास 5 ते 6 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो. त्यामानाने अवयव दात्यांची संख्या भारत देशात खूपच कमी आहे.. ही बाब लक्षात घेत, उदयकुमार पगाडे यांनी मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला.
एक स्वस्थ अवस्थेत मृत व्यक्तिपासून दुसऱ्या गरजू व्यक्तींना नवीन आयुष्य मिळू शकतो. त्यामुळे अनेक युवकांनी पुढाकार घेत अवयवदान करावे, असे आवाहन युवा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार पगाडे यांनी केले आहे..ह्यावेळेस ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडाळे सर, डॉ.जीवने, डॉ.नागमोती आणि समुपदेशिका आंबिलडुके मॅडम हजर होते..
.................................
दरवर्षी प्रमाणे, ह्यावर्षी सुद्धा अनोख्या पद्धतीने वाढदिवस संकल्प केला
मागील 10 वर्षांपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित समाजकार्य करत आहे. वृक्षारोपण, गरजूंना रक्तदान, अपघातग्रस्तांना मदत, शालेय उपक्रम, क्रीडा, योगा शिबिर, गरजूंना अन्न आणि वस्त्रदान, आत्मरक्षा शिबिर, अशा अनेक समाजपयोगी कामे "न्यु लाईफ बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी" ह्या सामाजिक संस्थेमार्फत संस्थापक - उदयकुमार पगाडे हे राबवित आहेत. यांच्या उल्लेखनीय समाजकार्यामुळे यांना 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले आहेत. व 2023 मध्ये यांना डॉक्टरेट मानद पदवी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे..
आपल्या प्रतिक्रिया द्या....