गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील भाग म्हणून ओळखला जाणारा चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा या गावातील व परिसरातील गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून दुर्गम भागातील रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून दुर्गम भागातील नागरिकांना याचा लाभ व्हावा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ची स्थापना करण्यात आली. पण दुर्दैवाने गडचिरोली जिल्ह्यातील पावीमुरांडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णांची गैरसोय होतो गर्भवती, महिलांना आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी चामोर्शी किंवा गडचिरोली येथे पायपीट करावी लागत होते म्हणून २०१२ साली प्राथमिक आरोग्य पथक पावीमुरांडा येथे बनविण्यात आले.परंतू आज घडीला या प्राथमिक आरोग्य पथक पावीमुरांडा याची खुप दयनीय अवस्थेत आहेत.या प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारी,अधिपरीचारीका, आरोग्य सेवक तसेच औषधी वितरक यांची या मुख्यालयात उपस्थित राहत नसल्याने या परिसरातील नागरिकांना, गरोदर मातांना प्राथमिक उपचार सुध्दा मिळत नाही. मुख्यालयात हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही पावीमुरांडा,मुकनुर,ढेकणी आबापूर ढेकणी या परिसरातील गावकऱ्यांची मागणी आहे.या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करा प्राथमिक आरोग्य पथक पावीमुरांडा कडे जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा यांचे दुर्लक्ष होत असून जिल्हा ठिकाणाहून ३० 40 किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पावीमुरांडा हा रामभरोसे आहे तर अतिदुर्गम भागातील अवस्था काय असेल