अकोला स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे दिव्यांग बांधवांना संपूर्ण भारतभर शिक्षण , रोजगार व आरोग्याच्या सोयी उपलब्ध करीत आहेत . त्यांच्या या कार्याची दखल स्थानिक राजकीय पक्षही घेताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.सुषमा कावरे व त्यांचे यजमान श्री.जयकिरण कावरे यांनी आपल्या ११ वर्षीय पुत्र अमर्त्य कावरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्याचा संकल्प केला. ४ डिसेंबर २०२३ रोजी अरुण दिवेकर सार्वजनिक वाचनालयात हा आगळावेगळा वाढदिवस दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व दिव्य ज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्थाच्या माध्यमाने साजरा करण्यात आला .

यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस अकोला चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा विशाल कोरडे ,सुषमा कावरे, जयकिरण कावरे,प्रतिभा काटे ,कुसुम कावरे, सुश्रुत कावरे, हरिदास भदे,निखिलेश दिवेकर, शामबाबू अवस्थी,रवी राठी ,दिवाकर गावंडे ,दिलीप आसरे ,पूजा काळे ,अविनाश देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते . वाढदिवसावर शिल्लक खर्च न करता अंध बांधवांना पांढऱ्या काठ्या देण्याचा संकल्प कावरे कुटुंबीयांनी पूर्ण केला .

दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले . या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार व आरोग्यासाठी वापरला जातो . उपस्थित सर्व मान्यवरांनी या स्टॉल मधून खरेदी केली व दिव्यांग बांधवांच्या कला कौशल्याचे कौतुक केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी कावरे कुटुंबीयांच्या या संकल्पाचा आदर्श समाजाने घ्यावा व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या आंतरराष्ट्रीय संस्थेला अधिकाधिक सहकार्य करावे असे आव्हान केले . ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्यत्व स्वीकारायचे आहे व दिव्यांगांना सहकार्य करायचे आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन वर संपर्क साधावा अशी माहिती सहसचिव डॉ संजय तिडके यांनी दिली .
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कोरडे , अनामिका देशपांडे ,विशाल भोजने ,अंकुश काळमेघ, अरविंद देव ,पूजा गुंटीवार , चंद्रकांत झटाले, पुरुषोत्तम आवारे,उमेश अलोने,भुषण टाले,स्वाती गावंडे, सुनिता ताथोड,ज्योती कुकडे,विद्या अंभोरे,कोकिळा वाहुरवाघ,अनिता दिघेकर, शामराव वाहुरवाघ, रामकृष्ण गावंडे,राम कोरडे, विष्णू लोडम ,शैलेश बोदळे,निजाम भाई,सागर कोरडे,अमीत कावरे,अमोल रावनकर,प्रदिप चोरे,राजु मोहोड,संजोती मांगे,चारुलता थेटे,पवित्रा जाधव,चंदा चव्हाण ,सदाशिव शेळके ,प्रिया कावरे,माला रामटेके यांनी सहकार्य तर सुत्रसंचालन जिल्हा महासचिव पिंटू भाऊ वानखडे यांनी केले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....